1) निरोगी असणाऱ्यांना निरोगी राहण्यासाठी
2) लहान मुलांना योग्य वाढीसाठी
3) वृद्धत्व सुखाने घालवण्यासाठी
4) उत्तम गर्भधारणा व निरोगी संततीसाठी
5) कोणतेही औषध चालू असेल तरी
6) निरोगी मनासाठी, स्ट्रेस, डिप्रेशन दूर ठेवण्यासाठी
7) कोणत्याही ऑपरेशनच्या आधी व ऑपरेशन नंतर.
सर्व प्रकारच्या खेळाडूंना.
9) लिव्हर ,किडनी, हृदय, मेंदू, फुफुस ,हाडांचे आरोग्य, नसांचे आरोग्य, पंचेंद्रिय यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी.
10) शरीर व मनाच्या सौंदर्यवर्धनासाठी.
अशा प्रत्येक ठिकाणी चांगल्या योग्य आहाराची गरज ही असतेच. औषधांची थेरपी कोणतीही घेतली तरी होमिओपॅथी असेल ,आयुर्वेदिक उपचार असतील, ॲलोपॅथी उपचार असतील किंवा नॅचरोपॅथी असेल किंवा योगा थेरेपी असेल पण शरीराच्या पेशींचे आरोग्य राखण्यासाठी आहारच हवा. शरीराला असणारी अन्नाची गरज ही अन्नानेच भरून निघते.
आजच्या मल्टिटास्किंग युगात अन्नघटक जास्त लागतात. बैठ्या जीवनशैलीमध्ये कमी कॅलरीजची गरज असते परंतु अन्नघटक मात्र योग्य मिळणे आवश्यक असते.बाळंतपण, मेनोपॉज न टाळता येणाऱ्या अवस्था सुद्धा जास्त कॅलरीजची गरज असते तसेच तिथे जास्त अन्नघटक सुद्धा लागतात.
वाढत्या वयात जास्त अन्न खाता येत नाही पण योग्य अन्नपदार्थ घेऊन शरीराची गरज भागवता आली पाहिजे.जिथे कम्प्युटर ,लॅपटॉप, जास्त टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो तिथे जास्त अन्नघटकांची गरज असतेच.नोकरी असो की घरचे काम संसार ,नोकरी ,गर्भारपण, बाळंतपण अशा अनेक अवस्थांमधून जाताना स्त्रियांना शरीर व मनाच्या ताकदी साठी जास्त अन्नघटक लागतात तशा कॅलरी सुद्धा जास्त लागतात. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, प्रदूषणाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी योग्य व नेहमीपेक्षा जास्त अन्नघटक लागतात. आहार आपल्या जीवनशैली नुसार असेल तर नक्कीच चांगल्या प्रकारचे आरोग्य मिळू शकते.