उपवास स्पेशल काकडीचे थंड सूप–

Calories–70 kcal, Protein- 3 gm,Fat-4 gm

साहित्य–काकडी एक (साधारण आकाराची )उकडलेला बटाटा अर्धा (छोटा ),पुदिना 10 ते 12 पाने, दही अर्धा कप,राजगिरा लाह्या चे पीठ 1 चमचा,काळे मीठ चवीप्रमाणे, जिरा पावडर ¼ चमचा इ.

कृती–

1)काकडीची साल काढून बारीक चिरून घ्यावी.

2) उकडलेला छोटा अर्धा बटाटा, दही, पुदिन्याची पाने, राजगिऱ्या लाह्याचे पीठ ,काळे मीठ सर्व मिक्सरला एकजीव करून घ्यावे.

3)यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून ते सूप प्रमाणे पातळ बनवून घ्यावे.

4) हे सर्व सुप एका ग्लास मध्ये घ्यावे त्यामध्ये वरून थोडीशी जिरा पावडर घालावी सजावटीसाठी एखादी पुदिन्याचे पान ठेवावे .

5) हे सूप थंड होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवावे.

6) आवडत असल्यास बर्फाचे खडे घालून हे सूप पिऊ शकता.

7) या सूप चे फायदे–

चांगले बॅक्टेरिया मिळतात, त्वचा हेल्दी बनते. हायड्रेशन चांगले राहते.