भारतीयांमध्ये कॅल्शिअमची गरज एन.एच.आय.व आर .डी .ए . सांगितले नुसार एक ते नऊ वर्षे मुलांमध्ये प्रत्येक दिवशी 600मिलिग्रॅम, दहा वर्षाच्या पुढील मुलांमध्ये 800 –1300 मिलिग्रॅम/दिवस, तर 19 ते 50 वयोगटामध्ये 1000मिलीग्रॅम /दिवस वयवर्षे 51 पासून पुढे 1200 मिलिग्रॅम /दिवस . आणि हीच गरज गरोदरपणात व स्तनपान करणाऱ्या स्त्रियांमध्ये आणखीन वाढते ती दिवसाला 1500 मिलीग्रॅम पर्यंत जाते. कॅल्शियम शरीरात तयार होत नाही ते अन्नपदार्थातूनच घ्यावे लागते. कॅल्शियमची गरज शरीराला रोज असते.
99 टक्के कॅल्शिअम हाडांमध्ये असते तर एक टक्का कॅल्शियम रक्तामध्ये असणे आवश्यक असते.हाडांना मजबूत व बळकटी देण्याचे काम कॅल्शियम करतच असते पण रक्तामधल्या कॅल्शियम मुळे हार्मोन्सची निर्मिती होते, ह्रदया सारख्या स्नायूंची कामे व्यवस्थित चालू राहतात ,काही लाईपेज सारख्या एन्झाईम्सना मदत करणे, रक्त्ताची घनता व्यवस्थित राखणे, रक्तदाब नॉर्मल ठेवण्यामध्ये मदत करणे अशी अनेक कामे कॅल्शिअम वर अवलंबून असतात.स्नायु चटकन उद्दीपित होऊन आकडी येणे हा प्रकारही रक्तातील कॅल्शियमची पातळी कमी झाल्याने होऊ शकतो. त्यामुळे सतत आपला मेंदू कॅल्शियमची रक्तातील पातळी नार्मल ठेवण्यासाठी जागरुक असतो.आणि जर अन्नातून कॅल्शियम पुरवठा कमी पडू लागला तर हाडातून काढून घेऊन शरीर रक्तातील कॅल्शियमची पातळी नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करते. कॅल्शियम मिळण्यासाठी दूध व दुधाचे पदार्थ, नाचणी सत्व, मोड आलेली कडधान्य दह्यासोबत घेणे, चिंचेच्या पाण्यामध्ये किंचित चुना वापरून पाणी आमटी किंवा भाजी मध्ये वापरू शकतो, आंबील किंवा ताकामध्ये ही चुना किंचित वापरू शकतो,पीठ भिजवताना दूध वापरू शकतो, सर्व प्रकारच्या पालेभाज्या ब्रोकोली, मटन ,मासे, चिकन, सोयाबीन अंडी अशा पदार्थातून कॅल्शियम मिळते.
कॅल्शियम जास्त असणारे पदार्थ व प्रमाण याचा तक्ता खाली देत आहे .
पदार्थ व प्रमाण तक्ता-
अन्नपदार्थ(100 ग्रॅम) – कॅल्शियम
म्हशीचे दूध. – 121मिलीग्रॅम
गायीचे दूध – 118मिलीग्रॅम
नाचणी – 364मिलीग्रॅम
गुळ – 107मिलीग्रॅम
शेंगदाणे. – 58मिलीग्रॅम
पांढरे तीळ. – 1283मिलीग्रॅम
काळेतीळ – 1664मिलीग्रॅम
अंडे – 57.7मिलीग्रॅम
संत्री 1 – 55मिलीग्रॅम
दूध पावडर – 1370मिलीग्रॅम
पनीर – 476मिलीग्रॅम
आळू पाने – 460मिलीग्रॅम
शेवगापाने – 314मिलीग्रॅम
चिंच – 283मिलीग्रॅम
विड्याचे पान – 207मिलीग्रॅम
फ्लॉवर पाने- – 96.7मिलीग्रॅम
लिंबू– – 90मिलीग्रॅम
दही – 149मिलीग्रॅम.