सारखे सारखे खाण्याची इच्छा होणे, फॅटी लिव्हर,केस गळणे ,उत्साह नसणे, अंग दुखत राहणे, वारंवार इन्फेक्शन होणे.लवकर जखम न भरणे.मूड स्विंग्ज इ.
ही आपल्यातील लक्षणे नक्की कशाची कमतरता दाखवतात?
शरीरातील पेशींची निर्मितीपासून, हार्मोन्स, वेगवेगळे एन्झाईम्स, स्नायूंची जडण-घडण अशा अनेक गोष्टींसाठी शरीराला प्रथिनांची गरज असते.दूध, दही, पनीर, मासे, अंडी, मांस , सोयाबीन डाळी ,कडधान्य यामधून प्रथिने मिळतात.
पूर्ण प्रथिने व अपूर्ण प्रथिने असे प्रथिनांचे प्रकार असतात.शरीराची ही गरज भागवताना पूर्ण प्रथिने मिळतील याची काळजी घ्यावी. अपूर्ण प्रथिनांमधील बरीचशी प्रथिने शरीराबाहेर टाकते व त्या वेळेला किडनी वर ताण पडण्याची शक्यता असते.
मुख्यतः शाकाहारी पदार्थांमध्ये अपूर्ण प्रथिने असतात म्हणून धान्य व डाळी किंवा धान्य व कडधान्य असे एकत्र खाल्ल्याने पूर्ण प्रथिनांचा लाभ घेता येतो.
तर मांसाहार शिजवून खाण्यामुळे त्यातील उत्तम प्रथिने मिळतात तर मांसाहार तळणे किंवा बार्बी क्यू (कोळशावर भाजणे) या स्वरूपातील प्रथिनांचा उपयोग शरीराला होऊ शकत नाही.
जन्मापासून मृत्यूपर्यंत शरीराच्या प्रत्येक अवस्थेत प्रथिनांची गरज असते. ती योग्य पद्धतीने मिळण्यासाठी योग्य आहार तज्ञांच्या सल्ल्याने आहार ठरवून घेतल्यास उत्साही राहण्यापासून योग्य वजन ठेवण्यापर्यंत फायदा होतो.