प्रकृति सांभाळताना

कोणत्याही औषधाची मात्रा जास्त झाल्यास ती ठराविक काळानंतर विषयाचे काम करते.
त्याच प्रमाणे एखादा अन्नपदार्थ गरजेपेक्षा जास्त घेतल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने घेतल्यास त्याचे काम ही शरीरातील आजार वाढवण्यास कारणीभूत ठरते.
म्हणूनच प्रकृति सांभाळताना काही खालील गोष्टींकडे लक्ष हवे.

1) वेटलॉस करताना प्रथिने घेताना त्याचा विचार हवा. काही पदार्थातील प्रथिने ही पचनशक्तीवर चुकीचा परिणाम करणारी असतात.
2) वजन वाढवताना आहारामधील वाढलेले फॅट्स ,कार्बोहायड्रेट्स शरीरातील ग्रंथींवर परिणाम करू शकतात .
3) मधुमेहा मध्ये साखर कंट्रोल मध्ये आणायची म्हणून अनुशे पोटी, कारल्याचा रस, कडीनिंबाचा रस, मेथीचे दाणे , रात्रीचे जेवण बंद करून फक्त सॅलॅड खाणे या सवयी घातक ठरू शकतात.
4) हृदयविकार टाळण्यासाठी प्रमाणाबाहेर काळे मीठ वापरणे हेही हृदयासाठी तितकसं चांगलं नाही.
5) चुकीच्या पद्धतीने बनवलेल्या आहारामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता तयार होते व पाठ दुखी कंबर दुखी अशा समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
6) ग्रीन टी ,ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी जर आपण मार्गदर्शनाअभावी घेत असू तर झोप न येण्याच्या समस्या वाढतच जातात.
7)आयुर्वेदिक तज्ञांना प्रकृती न दाखवता घेतलेले काढे हे लिव्हर व किडणीस हानिकारक असतात.
8) मैदा, साखर यांचे वाढलेले प्रमाण शारीरिक संतुलना बरोबर मानसिक संतुलन हे बिघडवते.