नुकताच पुणे येथे मिलेट्स मेला पार पडला. येणाऱ्या काळात भरड धान्याची आवश्यकता व महत्त्व वाढणार आहे.
मिलेटस मेला … MILLETS MELA
भाग एक……
2023 हे बाजरी या धान्याला समर्पित असं वर्ष आहे मुख्य म्हणजे यासाठी आपल्या देशानं, भारतानं पुढाकार घेतला संयुक्त राष्ट्रसंघानं हा प्रस्ताव मान्य करत 2023 ला बाजरी वर्ष (millet year) असेल अशी घोषणा केली.भारताच्या प्रस्तावाला 72 देशांनी पाठिंबा दिला.
भारतातच नव्हे तर जगभर बाजरीचे उत्पादन आणि विक्री वाढवण्यासाठी भारताचा पुढाकार आहे. Millet year सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी यशस्वी बनवण्यासाठी भारत सरकारनं एक कोअर समितीही स्थापन केली आहे. यामध्ये बाजरीवर संशोधन करणारे प्राध्यापक, शेतीतज्ञ, पोषण आहार तज्ञ, आचारी आदींचा समावेश आहे.याचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांतून चालू आहेत.
जेव्हा आदिमानवाने शेतीचा शोध लावला. काही गवतांचे बी खाण्यायोग्य आहे, हे ओळखून त्याची लागवड सुरू केली गेली .धान्याचा दाणा जितका लहान, तितके तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर आणि ब जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त. भरड धान्यात खनिजे व प्रथिनांचे प्रमाणही जास्त असते.
मिलेटस म्हणजेच भरडधान्यातील पोषणतत्वाचे महत्व समजून घेवून याचा रोजच्या आहारामध्ये वापर हवा.