आई पण भारी देवा…

एखाद्या जोडप्याला मूल नसणे हे वेदनादायक असते आणि हे कोणीच नाकारू शकत नाही. स्त्री किंवा पुरुष व्यंधत्व समस्या हे दुःख कितीतरी पटीने अधिक असते. आजही अनेक खेडेगावांमध्ये पुरुष व्यंधत्व समस्या दुय्यम मानली जाते. त्यावरील उपचार हे सिरियसली घेतले जात नाहीत कारण पुरुषाच्या प्रजोत्पादन क्षमतेचा त्याचा संभोग क्षमतेशी‌ केलेली तुलना किंवा सक्षम असल्याचा लावलेला गैरसमज होय.

पहिले बाळ वेळेवर होत नाही ही स्टेज प्राथमिक व्यंधत्व. अनेकदा एक मूल झाल्यावर दुसरे मूल होत नाही त्या स्टेजला सेकंडरी व्यंधत्व म्हणतात त्यानंतर वारंवार गर्भपात होऊन बाळ जन्माला न येणे हे म्हणजे थर्ड स्टेज व्यंधत्व म्हणतात.

जेव्हा शरीरामध्ये प्रमाणाबाहेरचे फॅट असते तेव्हा प्रेग्नेंसी वारंवार गर्भपात होणे किंवा प्रेग्नेंसीमध्ये होणारा रक्तदाब (preeclampsia)किंवा मधुमेह(gestational diabetes ) असे अनेक कॉम्प्लिकेशन्स तयार होऊ शकतात.healthy pregnancy म्हणजेच सशक्त गर्भधारणेसाठी डॉक्टर्स फॅट लॉस करा म्हणजेच वेटलॉस करण्याचा सल्ला देतात.

तसेच स्त्री व पुरुष दोघांचेही वजन योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते .कारण वजनामुळे कमी किंवा जास्त प्रमाणात झालेले हार्मोन निर्मिती ही स्त्रियांमध्ये वोविलेशन (ovulation )प्रक्रियेला डिस्टर्ब करते तर शुक्राणू निर्मितीमध्ये पुरुषांमध्ये अडथळा आणते.

पुरुषांमध्ये व्यंधत्व समस्या या बदललेली जीवनशैली मुळे असतात ज्यामध्ये फास्टफूड अति

मद्यपान ,अल्कोहोलिक पदार्थाचे सेवन किंवा अति कॅफेन घेणे. यामधून तयार होतात आणि यामध्ये काही न्यूट्रिअन्टसची कमतरता तयार होते .

पुरुषांमधील काही व्यंधत्व समस्या म्हणजे तणावग्रस्त जीवन त्यामुळे स्पर्म काउंट कमी होणे ,स्पर्म ऍक्टिव्ह नसणे किंवा स्पर्मचा आकार योग्य नसणे. शुक्राणू वाहू नलिकेत अडथळा असणे .तर

स्त्रियांमध्ये काही समस्या म्हणजे

वाढलेलं वय,अनियमित पाळी,हार्मोन्सच्या पातळीमधील चढ-उतार,एंडोमेट्रीयोसिस किंवा fallopian tube संबंधी समस्या.

कोणत्याही आरोग्य समस्या घेऊन ट्रीटमेंट चालू केली जाते तेव्हा त्याच्या जोडीला उत्कृष्ट दर्जाचा योग्य प्रमाणात आहार शरीराला हवा असतो. जो त्या ट्रीटमेंटला सपोर्ट करतो.

अशावेळी आहारात नैसर्गिक रित्या मिळणारे प्रथिने, कॅल्शियम, विटामिन सी, व काही अँटिऑक्सिडंटस यांचा समावेश हवा. प्रत्येक व्यक्तीनुसार -प्रकृतीनुसार आहार ठरवला जातो. जेव्हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो तेव्हाही शरीर प्रतिक्रिया देतच असते. फक्त आहाराचे किंवा चुकीच्या प्रमाणात घेतलेल्या सप्लीमेंट्सचे साईड इफेक्ट्स लक्षात येत नाही किंवा तिकडे दुर्लक्ष केले जाते व परत त्याच्या लक्षणांवरून परत एकदा औषधोपचार चालू केला जातो. त्यामुळे मूळ कारण तसेच राहते.

बाळ होण्यासाठी जेव्हाही तुम्ही ट्रीटमेंट घेत असाल तेव्हा तुम्हाला योग्य आहारतज्ज्ञांचा सल्ला हा ट्रीटमेंटचा एक आवश्यक भाग आहे.