आई पण भारी देवा…

मे मध्ये येणारा मदर्स डे आपण अनेक प्रकारे साजरा करतो. कारण आईचे महत्व कशानेच कमी होत नाही.

पण आजचा विषय थोडासा वेगळा आहे.

2022 मध्ये क्लिनिकमध्ये माझ्याकडे प्रियाची ट्रीटमेंट चालू झाली . लग्नानंतर दोन वर्षानंतर प्लॅन करून प्रेग्नेंसी राहिली परंतु थोड्याच दिवसात अबोर्शन झाले . नंतर मात्र प्रेग्नेंसी राहण्यासाठी अडथळे येऊ लागले. सुरुवातीला जो कॉन्फिडन्स होता पहिल्यांदा सहज बाळ झालं होतं आताही होईल हा मात्र हळूहळू कमी होत गेला. सततच्या ट्रीटमेंट बरोबर आता डॉक्टरांनी दहा किलो वजन कमी करायला सांगितले. प्रिया व नितीन दोघेही आयटीमध्ये नोकरी करणारे. लाईफस्टाईल चांगलीच होती. जिम चालू होते. प्रिया लठ्ठ कधीच नव्हती. नेहमी वजन 54 ते 56 किलोच्या दरम्यान मेंटेन केले होते. त्यामुळे तिच्यापुढे मोठा प्रश्न होता की डॉक्टरांनी वजन का कमी करायला सांगितले आहे.

मग तिच्या डायट हिस्ट्री बरोबर मी तिचे फॅट अनालिसिस व WHR रेशो काढला व तो तिला समजावून सांगितला. शरीरामध्ये चरबीचे प्रमाण हे 35% झाले होते. तर वेस्ट साईज 85 cm झाल्याने WHR 0.9 झाला होता. आता तिच्या लक्षात आले की वजन कमी करणे म्हणजे आपल्याला फॅट लॉस करणे आवश्यक आहे. जो या इंफर्टिलिटी ट्रीटमेंटचा एक महत्त्वाचा भाग आहे.

जितकी पोटावर चरबी जास्त असते तितके प्रजनन कार्यात अडचणी जास्त असतात.

कारण शरीरामध्ये चरबीच्या पेशी वाढल्या की इस्ट्रोजन हार्मोनची पातळी नॉर्मल लेवल पेक्षा जास्त वाढते .आता नैसर्गिक पणे शरीर यावर प्रतिक्रिया देते .

वजन नॉर्मल झाल्याने इन्सुलिन या हार्मोनचे काम चांगले होते रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थित राहते व त्यामुळे इतर हार्मोन्स चांगल्या प्रकारे काम करतात व सोबत प्रजनन क्षमता ही सुधारते.जेव्हा तुम्ही इन्फर्टिलिटी साठी वजन कमी करत असता तेव्हा ते वजन कमी करणे हे योग्य आहार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होणे गरजेचे असते. तिथे युट्युब वेट लॉस टिप्स किंवा गुगल चा उपयोग करायला जाऊ नये.

इस्ट्रोजन हार्मोन्स वाढल्यानंतर वजन वाढले असेल तर ते कमी करताना लो फॅट ,फायबर युक्त काही विशेष पदार्थांचा समावेश करणं आवश्यक असतं सोबतच चहा ,कॉफी पूर्ण बंद करणे आवश्यक. तसेच तणाव कमी करण्यासाठी काही अँटिऑक्सिडंट आहारात समावेश करणे आवश्यक असतं.