एक विसरलेले इंद्रिय– चांगले बॅक्टेरिया…..

संकल्प आहाराचा लेखमाला लिहायला चालू केली ते आरोग्य व आहार हा विषय मांडण्यासाठी . आणि लेख वाचून जेव्हा मनापासून आवडले असे रिप्लाय येतात सोबत आणखीन प्रश्नही येतात तेव्हा हा संवाद साधताना आणखीन छान वाटतं. कॅल्शियम प्रमाणे विटामिन बी12 वर लिहा,प्रतिकार शक्तीवर व मधुमेहावर वाचायला आवडेल असे अनेक विषय वाचकांमधून येऊ लागले. काय लिहायचे याची लिस्ट करताना अचानक लक्षात आले की आरोग्य असो की आहार यांचा पाया किंवा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या आतड्यांत असणारे चांगले बॅक्टेरिया यांची माहिती प्रत्येकाला असणे आवश्यक आहे.नाहीतर प्रथिने ,जीवनसत्वे, व खनिजे ,व्यायाम ,ऑक्सिजन, मन व शरीरातील अनेक घडामोडी यांची माहिती या चांगल्या बॅक्टेरियांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

फिटनेस राखण्यासाठी असो की प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी असो की छान दिसण्यासाठी असो किंवा निरोगी राहण्यासाठी असो पचनशक्ती ही चांगलीच हवी यांवर सर्व पॅथींमध्ये व सर्वसामान्यांमध्ये ही एकमत आहे. कारण स्वच्छ पचनशक्ती असेल तर सर्व आजारांपासून खरेखुरे प्रिव्हेंशन मिळेल.आणि स्वच्छ पचनशक्‍ती म्हणजे आतड्यांमध्ये असणारे चांगले बॅक्टेरिया जे आपले सर्वात मोठे संरक्षण कवच आहे. शारीरिक किंवा मानसिक रोगांशी लढण्यासाठी निसर्गाने दिलेले मानवाचे शस्त्र. पण इकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष होते. बघा ना प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आम्ही पालेभाज्या खाल्ल्या का? मला ताकत येण्यासाठी प्रथिने व कॅल्शियम कसे मिळविता येईल किंवा माझ्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी डिटॉक्स डाएट घेऊ का याविषयी आपण जागरूक झालो आहोत. पण शरीरामध्ये असणारे चांगले बॅक्टेरिया वाढण्यासाठी टिकवण्यासाठी मात्र थोडे आम्ही दुर्लक्षच करतो किंवा ही गोष्ट लक्षातच घेत नाही.कदाचित म्हणूनच डॉक्टरांनी या चांगल्या बॅक्टेरियांना THE 𝗙𝗢𝗥𝗚𝗢𝗧𝗧𝗘𝗡 𝗢𝗥𝗚𝗔𝗡 म्हणजे एक विसरलेले इंद्रिय असे नाव दिलं असावं. पण आपण कितीही विसरलो तरी रोग मात्र इथूनच सुरुवात करतात.

𝗧𝗛𝗘 𝗛𝗘𝗔𝗟𝗧𝗛𝗬 𝗚𝗨𝗧 𝗜𝗦 𝗧𝗛𝗘 𝗛𝗜𝗗𝗗𝗘𝗡 𝗞𝗘𝗬 𝗧𝗢 𝗣𝗘𝗥𝗙𝗘𝗖𝗧 𝗛𝗘𝗔𝗟𝗧𝗛 म्हणजे आपली आतडी अत्यंत चांगली असणे हीच आपल्या आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे. चला तर मग आजपासून आपण या हेल्दी गट ची माहिती घेऊ.