किडनी ट्रान्सप्लांट डाएट

 भाग दोन

किडनी ट्रान्सप्लांट नंतर निरोगी आयुष्य जगण्यासाठी किडनी दाता(Donar) व किडनी पेशंट या दोघांनाही योग्य आहार व योग्य व्यायाम याची गरज असते. त्यामुळे पेशंट सकारात्मकपणे पुढील आयुष्य घालवू शकतो.किडनी दात्याने ब्लड प्रेशर, लघवी तपासणी, ब्लड युरिया टेस्ट आणि संपूर्ण शरीर तपासणी वर्षातून एकदा करून आहार तज्ञांकडून आहार ठरवणे आवश्यक असते. त्याप्रमाणेच ज्यांच्यावर किडनी प्रत्यारोपण केले आहे. अशा रुग्णांनी जखम भरून येण्यासाठी व औषधांना योग्य साथ देण्यासाठी आहार व्यवस्थित ठेवावा लागतो.

या रुग्णांचा आहार पहिल्या सहा महिन्यातील आहार हा वेगळा असतो तर नंतरचा आहार  हा प्रकृती व औषधांनुसार वेगळा असतो. ट्रान्सप्लांट नंतर शरीरातील जखमा भरून येणे व नवीन पेशींसाठी प्रोटीनचे प्रमाण वाढवले जाते. व थोडे दिवसाने हेच प्रमाण जास्त वरून मध्यम प्रमाणात केले जाते.किडनी ट्रान्सप्लांट नंतर ऊर्जेची व योग्य प्रमाणात प्रथिनांची गरज योग्य प्रमाणात ऊर्जा मिळण्यासाठी दिवसातून तीन ते चार वेळा धान्य युक्त पदार्थ खाणे घेऊ शकतात.प्रोटीन साठी चिकन, अंडे, फिश साय काढलेले दूध ,दही, ताक, डाळी, कडधान्य आहार तज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य मात्रेत घेऊ शकता. तसेच फळभाज्या व पुरेशा पालेभाज्या यांचाही समावेश आहारात करावा म्हणजे शरीराला आवश्यक असणाऱ्या चोथ्याचे प्रमाण व्यवस्थित राहते.तसेच ट्रान्सप्लांट नंतर कॅल्शियम व फॉस्फरस लेवल याकडे लक्ष द्यावे लागते जर हे कमी असेल तर आपल्या हाडांशी संबंधित व स्नायूंशी संबंधित प्रॉब्लेम चालू होऊ शकतात त्यामुळे आहारामध्ये हे पदार्थ योग्य मात्रेत घेणे आवश्यक असतं यासाठी आहारामध्ये अंड ,दूध, दही यांचा वापर हवा. कॅल्शियमचे कोणतेही सप्लीमेंट डॉक्टरांना विचारल्याशिवाय घेऊ नये. ट्रान्सप्लांट नंतरचा आहार हा वेळोवेळी आहारतज्ञांना भेटून रिपोर्टनुसार व प्रकृतीनुसार बनवून घ्यावा लागतो.

आहारतज्ञ शीतल मुदगल