भाग तीन…
किडनी ट्रान्सप्लांट मध्ये रुग्णांनी कोणती पदार्थ खाताना काळजी घेतली पाहिजे?
किडनी ट्रान्सप्लांट मध्ये आपल्याला ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं त्यामुळे डॉक्टरांनी ठरवलेल्या प्रमाणातच सोडियम घेणे हे आवश्यक असतं म्हणून सोडियम जास्त असणारे जे पदार्थ आहेत ते कमी खाणं किंवा लिमिटमध्ये खावे हे किडनी ट्रान्सप्लांट पेशंट साठी महत्त्वपूर्ण ठरतं.
मग कोणते पदार्थ लिमिटमध्ये खाल्ले पाहिजेत.
पांढरे मीठ, दीर्घकाळ टिकवण्यासाठी प्रोसेस केलेला मांसाहार, मटन ,अति प्रमाणातील मांसाहार, फ्रोझन पदार्थ,पॅकेटमध्ये मिळणारे पदार्थ जसे नूडल्स, बिस्किट ,शेव, फरसाण ,सॉस ,खारवलेले पदार्थ जसे पापड ,लोणचे ,मुरांबे., वेफर्स खारे शेंगदाणे, पॉपकॉर्न इ.तसेच कच्चे (निरसे)दूध किंवा कच्चा दुधापासून बनवलेले पनीर किंवा त्याचे पदार्थ, अर्धवट शिजवलेले मास, अर्धवट शिजवलेले अन्न हे टाळले पाहिजे यातून पोटाचे आजार व इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. तसेच किडनी ट्रान्सप्लांट नंतर काही प्रतिबंधात्मक औषधे चालू असतात तर त्यांच्याबरोबर आहाराचा संयोग होऊन चुकीचे केमिकल्स तयार होऊन रिजेक्शनचे प्रमाण वाढू शकते म्हणून काही प्रमाणात द्राक्ष ,डाळिंब, किंवा डाळिंब ज्यूस, अल्फा अल्फा अँटिऑक्सिडंट असणारे कडधान्य टाळणे उचित ठरते.
या गोष्टी आपल्या आहारतज्ञांच्या व डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवून घेणे प्रत्येक रुग्णास आवश्यक असते.
आहारतज्ञ शीतल मुदगल