ॐ नमो भगवते वासुदेवाय
लहान बालकापासूनचा मनुष्याचा एक आदर्श जीवन प्रवास.
लोणी साखर, गोपालकाला प्रसाद ग्रहण करणे म्हणजे रसात्मक स्वादांचा आनंद घेत प्रवृत्तीतून निवृत्तीकडे केलेला प्रवास. यातील दही लोण्याचे महत्त्व तर आयुर्वेदामध्ये या खालील ओळींमधून सांगितले आहे.
” रोचनं दीपनं वृष्यं स्नेहनं बलवर्धनम्”!
प्रवृत्ती कडून निवृत्ती कडे जाताना आजच्या दिवशी तरी गोपालकाला खावा.
पोहे, ज्वारीच्या लाह्या /धानाच्या लाह्या, लिंबाचे वा आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ,/ भाजकी डाळ , फळांच्या फोडी(डाळिंब/पेरु) इत्यादी मिसळून तयार झालेला हा एक खाद्यपदार्थ असतो.
प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी पण थोडेफार पदार्थ हेच.
आहारशास्त्रानुसार गोपाळकालाचे फायदे—
1)पोट भरल्याची भावना दीर्घ काळ पर्यंत टिकून राहते. म्हणून दोन जेवणामध्ये भूक लागत नाही.
2)पचनशक्ती सुधारते.
लॅक्टो बॅक्टेरीया सारखे आतड्यांच्या आरोग्यास पोषक जीवाणू दह्यात असल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते.
3)हृदय व रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे दात आणि हाडे बळकट होतात. मणक्याचे आरोग्य सुधारते. तर जीवनसत्व बी 12 मुळे मज्जासंस्थेचे आरोग्य चांगले राहते.
4)प्रतिकारशक्ती वाढते.
5)तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते.–मेंदूतील सकारात्मकता वाढवणाऱ्या पेशीमधील रासायनिक प्रक्रिया वाढीस लागून चिंता, नकारात्मक विचार आणि औदासिन्य कमी होऊन मानसिक स्वास्थ्य आनंदी राहते.
6) त्वचा व केस यांचे आरोग्य सुधारते.
7) ऊर्जा व प्रथिने मिळाल्याने शरीराचा थकवा दूर होतो.
आहारतज्ञ शीतल