भाग 2
आपल्या देशामध्ये दर दुसऱ्या सेकंदाला रुग्णाला रक्त देण्याची आवश्यकता आहे. एक सर्वे असं सांगतो की प्रत्येक वर्षी चार कोटी युनिट रक्ताची आवश्यकता असते पण प्रत्यक्षात 40 लाख युनिट रक्त उपलब्ध असते. सध्या रक्तदान करण्यास पात्र असणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. वर्षातून दोन ते तीन वेळा रक्तदान करून सहज दुसऱ्यांना जीवनदान देता येते व स्वतः आरोग्यवंत होता येते.
रक्तदान कोण करू शकतो.
1) ज्यांचे वय 18 ते 65 वर्षापर्यंत आहे अशी व्यक्ती रक्तदान करू शकते.
2) ज्यांचे वजन 48 किलो पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती रक्तदान करू शकतात
3) ज्या व्यक्तींना मधुमेह, कॅन्सर ,एड्स ,मलेरिया, टीबी हृदयविकार, किडनी विकार , त्वचा विकार नाही त्या व्यक्ती रक्तदान करू शकतात.
4) नविन नियमानुसार ज्या व्यक्तींचा मधुमेह व रक्तदाब गोळ्या द्वारे नियंत्रित असतो त्या व्यक्ती डॉक्टरांच्या सल्ल्याने व सर्टिफिकेट घेऊन रक्तदान करू शकतात.
रक्तदान कोण करू शकत नाही..
1) जर सर्दी ,फ्लू ,घसा खवखवणे, किंवा कोणतीही इन्फेक्शन असल्यास रक्तदान करता येत नाही.
2) हिमोग्लोबिनची पातळी 12.0gm/dl कमी असल्यास
3) गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला नी रक्तदान करू नये.
4) मासिक पाळी सुरू असल्यास त्या महिलांनी रक्तदान करू नये.
5) जर तुम्ही नुकताच टॅटू किंवा बॉडी पिअरिंग केले असेल तर त्या तारखेपासून सहा महिन्यापर्यंत रक्तदान करण्यासाठी परवानगी नसते .
6) जर दातांशी संबंधित मोठे उपचार चालू असतील तर ठराविक काळ रक्तदान करता येत नाही.
7) जे लोक अँटीबायोटिक्स घेत आहेत ते लोक निरोगी होईपर्यंत रक्तदान करू शकत नाही.
क्रमशः
महारक्तदान शिबिर
23 एप्रिल 2023
पुणे
स्थळ – आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड, पुणे.
वेळ –सकाळी 9.00a.m.–6.00p.m.
मुंबई
न्यू इंग्लिश स्कूल बांद्रा ईस्ट मुंबई
वेळ –सकाळी 9.00a.m.–6.00p.m.