जागतिक कर्करोग दिन महत्त्वाचा आहे.
आहार आणि जीवनशैली बरोबर आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आज अनेक हॉस्पिटलमध्ये या मोफत तपासणी होतात. आम्ही जेवढ्या तत्परतेने एखाद्या प्रदर्शनाला , किंवा कुठेतरी लागलेल्या सेलला भेट देऊन काही फायदा होतो का बघतो तेवढी तत्परता मात्र कॅन्सरच्या या दिवशीच्या तपासणीच्या फायद्या बद्दल दाखवत नाही.
सजीव जितका अधिक जगतो तितकी त्याच्या काही गुणसूत्रांमध्ये कर्करोगाला पूरक Mutation (उत्परिवर्तन) होण्याची शक्यता अधिक असते. माणसाच्या शरीरात एकूण सुमारे 37 ट्रिलियन पेशी असतात. त्यामुळे वाढत्या वयानुसार कर्करोगाची शक्यता वाढणे अपेक्षितच आहे. ही काही नवीन कल्पना नाही.
सरासरी आयुर्मानात वाढ झाल्याने विकसित देशांमध्ये कर्करुग्णांची वाढलेली संख्या दिसू लागली आहे. थोडक्यात सांगायचे तर आपण – एक प्रजाती म्हणून –दीर्घायुष्याची किंमत चुकवत आहोत का?
भारतातील कर्करोगाचे वाढते प्रमाण हे चिंताजनक आहे. भारतात दरवर्षी अंदाजे चौदा लाख नवीन रुग्णांना कॅन्सरचा प्रादुर्भाव होतो. नऊ लाख लोक मृत्युमुखी पडतात. त्यातील एक कारण निदान वेळाने होते.
सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक तृतीयांश कर्करोग टाळता येतो.
बर्याच कर्करोगांसाठी लक्षणे आहेत आणि ती लवकर ओळखण्याचे फायदे आहेत.
सुमारे तीस ते पस्तीस टक्के कर्करोग प्रतिबंधात्मक उपाय योजनाद्वारे पूर्णपणे टाळता येऊ शकतात याबद्दल समाजात जागरुकता निर्माण करण्याची नितांत गरज आहे. व्यसनमुक्ती, नियमित व्यायाम, जीवनशैली व आहारातील सकारात्मक बदल, हिपॅटायटीस व एचपीव्ही लसीकरण तसेच नियमित कॅन्सर स्क्रीनिंग असे काही महत्त्वाचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत.
आणि कॅन्सर झाल्यानंतर च्या नवीन खूप चांगल्या ट्रीटमेंट पण उपलब्ध आहेत .
आहार तज्ञ शीतल मुदगल.