जागतिक महिला दिनानिमित्त आहार टीप.. तूप व स्त्रीआरोग्य

यंदाच्या म्हणजेच 2023 च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम ‘एम्ब्रेस इक्विटी’  आहे. प्रत्येक स्त्रीची  ही समानता परिस्थिती वेगवेगळी असते त्यामुळे सर्वांना समान स्तरावर पोहचवण्यासाठी त्यांना योग्य साधनांबरोबरच समान पातळीवर नेण्यासाठीच्या संधीही त्याच प्रमाणात उपलब्ध  व्हाव्यात असा या थीमचा आशय.

ही इक्विटी म्हणजेच  समानता प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या आरोग्यालाही देता येईल.

स्त्री म्हंटली की मूड स्विंग्ज येतातच.स्वतःवर प्रेम करताना स्त्रियांनी   शरीर व मनाचा बॅलन्स ठेवायला हवा.

त्यासाठी रोजच्या आहारात दिवसभरामध्ये कमीत कमी एक छोटा चमचा साजूक तूप खावे.जागतिक महिला दिनानिमित्त   ही आहार टीप आपण पाळायला हवी. स्त्रीआरोग्याची काळजी घेणाऱ्या घरातल्या व्यक्तीनी आपल्या घरातील महिला   रोज एक छोटा चमचा तूप कशा खातील याकडे लक्ष द्यावे.

रोज एक चमचा साजूक तूप खाल्ल्याने..

1)अन्नपदार्थांचे शोषण व पचन चांगले होते.

2)त्वचा व केसांचे आरोग्य चांगले राहते.

3)मनाचे संतुलन राखण्यास मदत होते .

4)हाडांचे आरोग्य चांगले राहते.

5)डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

6) मनाने व शरीराने अधिक तरुण राहता…

अहो शास्त्र असतं ते……

आहारतज्ञ  शीतल मुदगल.

7276415838