डाएट म्हणजे-

प्रत्येक जीवाला अन्नाची गरज असते ते शरीराच्या ताकदीसाठी, विकासासाठी, योग्य पेशी उभारणीसाठी फक्त पोट  भरण्यासाठी नाही.

आहार म्हणजेच डाएट हा आपल्या लाईफ स्टाईल शी मॅच होणारा म्हणजे सुसंगत हवा. खरा डाएट हा शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवणारा ,ताकदी बरोबर शरीराचे योग्य बांधणी ठेवून शाश्वत आरोग्य देणारा असतो.

डाएट म्हणजे कॅलरीज, प्रोटीन मोजणे नसते, सप्लिमेंट घेणे नसते ,नुसतेच चांगले दिसणे नसते. तर डाएट म्हणजे निरोगीपणाचा, उत्साही असण्याचा, फ्रेश असण्याचा, आनंदी असण्याचा अनुभव असतो.

 जगण्यासाठी काहीही खाणं सोप आहे पण योग्य आहार घेणे मात्र अवघड आहे. योग्य आहारानेच खरा फिटनेस ताकद मिळते. फक्त सॅलेडच खाणे, अंडी मांसाहारच घेणे, किंवा दिवसभर ज्यूस घेणे याने पोट भरत असेल पण शरीराच्या गरजा पूर्ण होत नाहीत. वेड्यावाकड्या खाण्याचा परिणाम वेडावाकडाच होतो.

“उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म”

हा यज्ञकर्म करण्यासाठी योग्य आहार म्हणजेच डाएट हवा.

For Right Nutrition Choose Right Dietitian.