आपल्या शरीरातील पोषक तत्त्वांचं प्रमाण वाढवून आपली मलनिःसारण क्रिया विनासायास पार पाडण्यासाठी आहारात ज्या पदार्थांचे वापर करणं आवश्यक आहे ते म्हणजे डिटॉक्स डाएट.
मग जेवण बंद करून फक्त फळांचे रस, भाज्यांचे रस , बाजारात मिळणारी डिटॉक्स ड्रिंक , फायबर पावडरी प्यायल्याने शरीराचं क्लिन्सिंग होतं का नक्कीच नाही .शास्त्र असतं ते…
आपल्या शरीरातील यकृत, मूत्रपिंड आणि आतडे यांचं डिटॉक्सिफिकेशनचं काम आहे.ते चालूच असते. शास्त्रच असतं ते…
मग डिटॉक्स डाएट काय करतं? अर्थात, या अवयवांची कार्यक्षमता वाढवते व यांच्या कामातील अडथळा दूर करते.
थोडक्यात काय तर आपल्या पचनसंस्थेला आनंदी ठेवतं. काही सोपे पदार्थ आणि आहारातील सोपे उपाय आपल्या अति खादाडीवर किंवा चुकीच्या खाण्याच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीवर अंकुश ठेवू शकतात. मनावर कंट्रोल ठेवून शरीराला योग्य पद्धतीने काम करण्यास भाग पाडते.शास्त्र असतं ते…
त्यामुळे
रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहणं
रक्तातील हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात राहणं
पोट नियमितपणे साफ होणं
उत्तम झोप लागणं
दिवसभर प्रसन्न आणि कार्यक्षम राहणं
अतिरिक्त चरबीचं प्रमाण कमी होणं असे फायदे होवू शकतात.
डिटॉक्स डाएट हा आहारतज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करायचा असतो कारण तो वैयक्तिक असतो .तेव्हा योग्य डिटॉक्स डाएट हा योग्य मार्गदर्शनाखाली घेणे हे महत्त्वाचे.
अहो शास्त्र असतं ते….