आहारामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जीवनसत्व अ,इ, क,ड तसेच कॅल्शियम, प्रथिने ,झिंक, व काही खनिजे , लाईकोपिन आवश्यक आहेत.
1)सोयाबीन, मोड आलेले कडधान्य, डाळी, व्यवस्थित तापवलेले दूध, घरचे ताजे दही हे प्रोटीनसाठी आपण घेऊ शकतो.
2) अ जीवनसत्व साठी गडद रंगाच्या हिरव्या पालेभाज्या अळू,मेथी , चवळी, पालक इ. तसेच केसरी लाल रंगाच्या भाज्या गाजर, ,लाल भोपळा, टोमॅटो, पपया घेऊ शकतो.(भाज्या अतिप्रमाणात पाणी घालून शिजवू नयेत). भाज्या बनवण्याआधी कंपल्सरी पंधरा मिनिट मिठाच्या पाण्यात भिजत ठेवणे.
3) क जीवनसत्व साठी लिंबू ,आवळा, मोड आलेल्या कडधान्य, संत्री ,पेरू , फळे घेऊ शकतो.
4)तसेच प्रमाणात साजूक तूप , खोबरं, घेऊ शकतो. त्याबरोबर अक्रोड, बदाम, तेलबिया घेऊ शकता.
5)याबरोबरच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण लसुन, सुंठ पावडर, हळद , तुळस पाने, पुदिना यांचाही वापर करावा.
इथे आपल्याला आठ वर्षांपूर्वी सद्गुरु डॉक्टर अनिरुद्ध जोशी(M.D.Rheumatologist) यांची शताक्षी प्रसादम ही रेसिपी प्रतिकार शक्ती वाढविण्याचे दृष्टीने खूपच सुंदर व उपयोगी आहे.
शताक्षी प्रसादम–सुंठ पावडर+ हळद+मध+एक चतुर्थांश लसणाची ठेचलेली पाकळी सर्व एकत्र करून ही गोळी अनुशेपोटी घेणे.(मी स्वतः याचे खूप चांगले रिझल्ट पाहिले आहेत).
6)पाणी भरपूर पिणे
7) प्रतिकारशक्ती वाढीसाठी सकाळचे कोवळे ऊन घेणे हेही खूप महत्त्वाचे आहे.
8) रोज सकाळी उठल्यानंतर पहिले अर्धा तास स्वतःला देणे म्हणजे व्यायाम करणे, प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी अतिशय आवश्यक आहे.
9) व सर्वात महत्त्वाचे टेन्शन घेऊ नये.नेहमी हसत राहणे (Don’t take wrong intention हसत राहणे म्हणजे स्वतःला नेहमी आनंदी ठेवणे)
**काय करू नये-
1) हॉटेल चे पदार्थ,मैद्याचे पदार्थ, पॅकेट मधील पदार्थ, ( process food) एकाच तेलात वारंवार तळलेले पदार्थ, खूप मसालेदार पदार्थ टाळावेत.
2) सर्व प्रकारचे कोल्ड्रिंक्स ,थंड पदार्थ, अल्कोहल ,धूम्रपान टाळावे
3) स्वतःची शारीरिक स्वच्छता ठेवणे.
4) आसपासच्या परिसरातील कचरा, धूळ, प्रदूषण या प्रकारापासून दूर राहणे.
5) सध्या (कोरोना व्हायरस मुळे) सर्व प्रकारचा मांसाहार टाळणे फायदेशीर राहील.
6) सकाळी सात नंतर झोपेतून उठणे टाळावे.(प्रतिकारशक्ती साठी सुद्धा बॉडी क्लॉक व्यवस्थित असणे आवश्यक असते.)
Dietician Sheetal
7276415838