फिटनेस जमान्यात  महिलांनी घेण्याची काळजी

कुटुंबाला हवं ते दिलं की कुटुंब सुखी व आनंदी होतं हे कौटुंबिक सुखाचे रहस्य प्रत्येक स्त्रीला माहीत असतं.त्याचप्रमाणे आपल्या शरीराला जे हवं तेच दिलं तर शरीराचा छान आरोग्य जपता येतं.स्त्रियानी भूक भागवण्यासाठी म्हणून न खाता आरोग्य टिकवण्याच्या दृष्टीने भूक नीट कशी भागेल याचा विचार करून खाल्ले तर योग्य ते अन्नघटक मिळतील. आधुनिक काळात झालेल्या आहारातल्या अनिष्ट बदलांमुळे अनेक पोषक अन्नघटक आपल्याला मिळतच नाहीत.पचन संस्था व आपण पोटात घेतलेले अन्न यांचा परस्पर संबंध असतो तो आपल्या निरोगी आरोग्याशी.-जसं पोषक अन्नघटक असतील तर कंबर दुखी कोलेस्ट्रॉल वाढणे थायरॉइड असे अनेक आजार दूर राहू शकतात. पोषक अन्नाशिवाय गर्भवाढ शक्‍य नसते, सुलभ डिलेव्हरीसुद्धा शक्य नसते. योग्य पोषणावरच वजन सुद्धा अवलंबून असते. योग्य वजनामुळे शरीरातील ईस्ट्रोजन हार्मोन्सचे काम सुरळीत चालू राहते.

म्हणून प्रत्येक दहावर्षाच्या पुढील प्रत्येक स्त्रीने  खालील अन्नपदार्थ दिवसभरात एकदा तरी घेण्याचा प्रयत्न करावा. 

1)शिजवलेली पालेभाजी एक मध्यम वाटी

2)शिजवलेले डाळी किंवा कडधान्यांच्या उसळी एक मध्यम वाटी

3) शिजवलेले मोड आलेले धान्य किंवा कडधान्य

 एक मध्यम वाटी

4) एक वाटी ग्रीन स सलाड किंवा कच्ची कोशिंबीर लिंबू पिळून

5) नाचणी बाजरी मिळून एक भाकरी

6) स्निग्धपदार्थ तेल -एक टेबल स्पून आणि साजूक तूप एक टीस्पून

7) भाजलेले सोयाबीनचे पीठ एक टेबल स्पून

8) मेथीदाणे -एक टीस्पून

(जर काही ठराविक गंभीर आजार किंवा allergy असेल तर वरील माहितीमध्ये बदल होऊ शकतो)

शरीराच्या ऍक्टिव्हिटीनुसार हालचाली नुसार व शरीराच्या गरजेनुसार -वयानुसार भात, चपाती भाकरी चे प्रमाण ठेवावे तसेच दूध ,मांसाहार ,फळे ,साखर गूळ ,लोणी, तूप हे प्रकार आवश्यकतेनुसार जपून वापरावेत.

कुमारिका गर्भधारणा बाल संगोपन मातृत्व मेनोपोज अशावेळी पुन्हा एकदा व्हिटॅमीन डी, प्रोटिन्स, कॅल्शियम यांची गरज वाढत जाते अशावेळी डॉक्टरांनी किंवा आपल्या आहारतज्ञांनी जर काही मल्टी व्हिटॅमिन्स किंवा सप्लीमेंट सुचवली असतील तर तो कोर्स पूर्ण करावा. शांत झोप घ्या.

समतोल आहाराबरोबर शरीराला व्यायामाचीही गरज असते ती पाळायला हवी