1सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा सध्या न्यूट्रिशन माह साजरा केला जातो पूर्वी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर न्यूट्रिशन वीक असे.
आहारशास्त्र ही काळाची गरज आहे व पुढेही असणारच आहे.
पण आपल्याकडे दोन्ही गोष्टी दिसतात एकीकडे आहाराविषयी ची वाढती जागरुकता तर दुसऱ्या बाजूला फिटनेसचे फॅड म्हणून दुर्लक्ष करणे.
भारतातील 60 टक्के पेक्षा अधिक लोक ही कुपोषित आहेत. पूर्वी अन्न न मिळाल्याने कुपोषण होत असे, आज खात्यापित्या घरांमध्येही कुपोषण दिसून येते.
जसं उपाशी राहिल्याने, अन्नघटक कमी पडल्याने कुपोषण होते तसेच शरीरामध्ये अन्नघटक जास्त प्रमाणात झाल्यावर ही कुपोषण होतेत. खूप खाण्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कुपोषण होत असते. कारण सर्वच खाणे-पीणे हे अन्न प्रकारात येत नाही कारण त्यामध्ये अन्नघटकच नसतात.
अतिबारीक ,अतिलठ्ठ, मधुमेह हृदय विकार, ऍसिडिटी ,गॅसेस, वारंवार पोटबिघडणे ,हातापायाची जळजळ, सांधेदुखी, झोप न येणे, बद्धकोष्टता, कॅन्सर, चंचलता, अंगदुखी, त्वचाविकार ,असे अनेक विकार यांची मूळ कारण अन्नघटकांच्या कुपोषणामध्येच असते.
अनेक वेळा स्वच्छता ठेवून ,सर्व काळजी घेऊन, रोज न चुकता व्यायाम करून, काढा -स्मूदी पिऊन , भरपूर अंडी -सॅलेड खाऊन, पालेभाज्या खाऊन, प्रोटीन पावडरी, घेऊनही आजार इन्फेक्शन होतातच की.कारण मूळ कारणावर त्या पूर्ण शरीराच्या आवश्यकतेवर मात्र काम केले जात नाही. उदाहरणार्थ व्हायरल इन्फेक्शन झाले ,कोवीड असो, कॅन्सर असो किंवा जुलाब असो भरपूर पाणी प्या, इलेक्ट्रॉल घ्या, ज्यूस घ्या, सुप घ्या, डीहायड्रेशन होऊ देऊ नका असे सांगितले जाते. याने शरीरात पाण्याचे संतुलन नक्की ठीक होईल. पण हे सर्व आजार होण्यामागे कुठेतरी शरीराचे कुपोषणही कारणीभूत आहे हे समजून घ्यायला हवे.
योग्य पोषण हाच खरा उपाय आहे तेव्हाच निरोगीपणा येईल. निरोगी व्यक्ती ही शारीरिक मानसिक व बौद्धिक दृष्ट्या निरोगी असते. समाजाची देशाची प्रगती हवी असेल तर देशातील प्रत्येक व्यक्ती ही निरोगी हवी तरच समाज निरोगी व सशक्त प्रगतिशील बनेल.