मिलेटस मेला

भाग 2…..

संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालानुसार जगभरात उपासमार होत असलेल्यांची संख्या 79 कोटीवर पोहोचली आहे. ‘2023 स्टेट ऑफ फुड सिक्युरिटी न्यूट्रिशन ‘या अहवालानुसार आरोग्यासाठी अपायकारक अन्नपदार्थ खाणाऱ्यांची वाढणारी संख्या ही चिंताजनक बाब आहे असे स्पष्ट सांगितले आहे. जगभरात 78 कोटी जण उपासमारीचा सामना करीत आहेत तर अपुऱ्या अन्नामुळे सुमारे पंधरा कोटी मुलांची वाढ खुंटली आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे धान्याच्या पुरवठा बाधित झाला असून त्याचा परिणाम अन्नधान्याच्या दरावरही होत आहे यामुळे उपासमार समस्या आणखीन वाढू शकते असे संयुक्त राष्ट्रसंघाचा एक नविन अहवाल सांगतो.

संयुक्त राष्ट्र संघाने पूर्वी एक अंदाज व्यक्त केला होता की या दशकाच्या अखेरीपर्यंत जगभरातील 60 कोटी जण कुपोषित असतील व यामध्ये मुलांची संख्या मोठी असेल. संयुक्त राष्ट्र संघाने 2030 चा काळ याहून हे चिंताजनक असू शकतो याची जाणीव करून दिली आहे.

यानिमित्ताने 2023 Millets Year – बाजरी वर्ष मध्ये पुन्हा एकदा जगासमोर आलेली मिलेट्स धान्यांची माहिती महत्त्वपूर्ण ठरते.

ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी,राळा,राजगिरा, कोद्रो, कुटकी, सावा अशी अनेक भरडधान्य(मिलेट्स) आहेत.

प्रत्येक भरडधान्यामध्ये वेगवेगळी पोषणतत्व आहेत.

मी स्वतः काही महिन्यांपासून अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या आहारामध्ये वजन कमी करणे व रक्तदाब, अपचन या समस्यांमध्ये रात्रीच्या आहारामध्ये राळ्याचा तांदूळ वेगवेगळ्या प्रकारे देऊन पहिला व खरोखर रिझल्टस खूप चांगले आले.