मिलेटस मेला

भाग 3….

जागतिक कुपोषण कमी करण्यासाठी व मिलेट्स वर्ष साजरे करताना पोषणतज्ञ/आहारतज्ज्ञांची यांची भूमिका महत्त्वाची वाटते.

1)मिलेट्स धान्यांमध्ये खनिजे जास्त आहेतच पण ती प्रोबायोटिकसारखेही काम करतात त्यामुळे काही प्रमाणात ऍसिडिटीचा त्रास कमी होतो.

2) त्यात भरपूर फायटोकेमिकल्स ( Phytochemicals) आहेत. त्यात ग्लुटेन नसल्यामुळे त्यामुळे होणाऱ्या विविध ॲलर्जीपासून बचाव होतो.

३) भरडधान्ये नियमित खाण्यात असल्यास रक्तातील शर्करा (triglycerides, C- reactive Protein) कमी होत जाते. परिणामी, हृदयरोगाची शक्यता कमी होते.

4) सर्वच भरडधान्यामध्ये भरपूर तंतुमय पदार्थ (फायबर) आहेत. त्यामुळे पचनसंस्थेचे आरोग्य चांगले राहते.

5) त्याच प्रमाणे ही धान्ये सावकाश पचत असल्याने दीर्घकाळ पोट भरल्याची भावना राहते. परिणामी, सतत व अतिखाण्याची समस्या असल्यास किंवा स्थौल्यत्वाची समस्या असलेल्या व्यक्तींसाठी ही भरडधान्ये अत्यंत उपयोगी आहेत.

डाएटप्लान बनवताना ‌आहारतज्ञ समस्येनुसार,आजारानुसार , पचनशक्ती नुसार योग्य ठिकाणी मिलेट्स वापरतच असतात.

महाराष्ट्राला हे मिलेट्स नविन नाहीत. पूर्वी महाराष्ट्रात मुख्यत: ज्वारी आणि बाजरी ही पिके घेतली जात. पुण्यात बाजरीची, तर कोल्हापूर-सोलापूरमध्ये ज्वारीची भाकरी हेच मुख्य धान्य असे.

मिलेटस (Millets) ही एक प्रकारची पौष्टिक पीक असतात जी डोंगराळ, किनारी, पावसाळी आणि कोरड्या भागात सहजपणे मिळवता येते.

आपल्या आरोग्यासाठी आपण आहारात मिलेटसचा-भरडधान्याचा समावेश करुया.