1) साखर हा प्रकार शरीरात ऍसिडिटी वाढवतो, हाडांमध्ये ठिसूळ बनवतो.
2) तळलेले , मैद्याचे,कृत्रिम रंग ,कृत्रिम वास,सोडा , सॅकरीन सारखे स्वीटनर्स घातलेले मोदक हे आतड्यांना, हृदयाला सोबतच स्मरणशक्तीला हानिकारक ठरू शकतात.BUT WHO CARES..
3) जर खाण्यात तेल, साखर, मैदा ,वनस्पती तूप हे येणार असेल तर व्यायामाबरोबर शरीराला थायमिन नावाच्या विटामिन ची गरज जास्त लागते. ते आहारात घेताय ना याची काळजी घ्या.
4) कोणताही पदार्थ प्रमाणाबाहेर खाण्यामुळे ही कुपोषण होऊ शकतं. योग्य अन्न घटकांचा पुरवठा न झाल्याने हृदय तर आजारी पडतेच, फॅटी लिव्हर होतेच सोबतच शरीरातील चांगल्या बॅक्टेरियांचा नाश होऊन आतड्यांचे आरोग्य बिघडते.
तेव्हा मोदक खाताना व खाऊ घालताना काळजी घ्या.
अहो शास्त्र असतं ते…