1)HBA1C –गेल्या तीन महिन्यांमध्ये माझी रक्तातील साखर किती नियंत्रित आहे? आपण प्रीडायबेटिक आहोत का?
सर्वसाधारण व्यक्तींमध्ये Hba1c ची लेव्हल 4 ते 5.7इतकी असते. तपासणीत ही लेव्हल आल्यास त्या व्यक्तीला मधुमेह नाही हे समजते.
तर तपासणीची लेव्हल 5.7 ते 6.4 इतकी आली तर सदर व्यक्ती प्रीडायबेटीक म्हणजेच भविष्यात मधुमेह होऊ शकणारी आहे असे समजते. अशा लोकांनी वेळेवर व्यायाम आणि डाएट कंट्रोल करून स्वतःला मधुमेह होण्यापासून रोखावे.
2)BSL(R)– सर्वसाधारण सध्या रक्तातील साखर किती आहे?
3) BODY FAT ANALYSIS –आपल्या शरीरात फॅटचे प्रमाण किती आहे? नक्की किती प्रमाणात फॅट लॉस व्हायला हवा?
शरीरामध्ये मसल्स प्रोटीन किती प्रमाणात आहेत?
सध्या तुमचे शरीर किती वयाप्रमाणे काम करते?
4) HAND GRIP –हाताच्या स्नायूंमध्ये किती ताकद आहे? हे वेळोवेळी माहीत असणे गरजेचे असते. आपण जाड असलो तरी ही ताकद कमी असू शकते किंवा बारीक असलो तरीही ताकद कमी असू शकते?
पकडणे, उचलणे यासाठी हातांचा केला जातो. तसेच, एक सामान्य नियम म्हणून मजबूत हात असलेले लोक इतरत्रही फिट असतात.
जेव्हा योग्य मार्गदर्शन मिळते तेव्हा शरीराला साईड इफेक्ट भोगावे लागत नाही. नैसर्गिक पद्धतीने आरोग्य चांगले ठेवता येते. व संपूर्ण कुटुंबाची आरोग्य व फिटनेस चांगला होतो.