आज सकाळी कोरोना व्हायरस असणारी पीडीएफ फाईल मी ग्रुप वर पाठवले व अनेक प्रश्न चालू झाले रोज कीवी फळ खाऊ का ड्रॅगन फ्रुट रोज खायचं का? प्रोटिन्स साठी अंडी खाऊ का? वेळेअभावी सर्व माहिती देणे शक्य नाही परंतु आपणा सर्वांना सर्व सामान्य माहिती असणे आवश्यक आहे.
कोणताही व्हायरस किंवा जे रोगजंतू असतात ते शरीरात येण्याचे चार मार्ग असतात. १)नाकावाटे २)घशावाटे ३)गुदद्वारा वाटे आणि ४)चौथा घाम, डोळेइ. वाटे
नाक व घसा याठिकाणी सिलिया (केसासारखे रचना असणारे)बाहेरून येणारे जंतूंना अडवून धरतात परंतु सिलीयाची शक्ती अ जीवनसत्वामुळे वाढत असते व जीवनसत्व मिळाले नाही तर त्यांची ताकद कमी होते .तसेच अ जीवनसत्व साठी प्रोटीनची पण आवश्यकता असतेच. शरीरात गेलेले जंतू पेशींमध्ये जाण्यापुर्वी सुद्धा त्यांना अटकाव होऊ शकतो पण त्यासाठी पेशींचे आवरण हे मजबूत असणं अतिशय आवश्यक असतं पेशींच्याआवरणासाठी आवश्यक असतं ते प्रोटीन बरोबर अ आणि क जीवनसत्व. तसेच गुदद्वारा वाटे आत आलेल्या जंतूंना अडवण्यासाठी इंटेस्टिंनल फ्लोरा काम करतो म्हणजेच मोठ्या आतडयात असणारे आवश्यक जीवजंतू. पण जर वारंवार पोट बिघडण्याची सवय असेल किंवा बेकरीचे पदार्थ खाणे असेल किंवा साखरेचे पदार्थ खाणे असेल तर इंटेस्टिंनल फ्लोरा कमी होतो आणि रोगजंतूंचा धोका वाढतो. तसेच आपल्या लिव्हरच्या सहाय्याने शरीर प्रतिकारासाठी पांढऱ्या रक्त पेशी, लिम्फ पेशी ,अँटीबॉडीज , इंटरफेरोंन असे वेगवेगळे नऊ साहाय्य करणाऱ्या गोष्टींची निर्मिती करत असते. (आपण जेव्हा एखादी लस घेतो तेव्हा नक्कीच या ठिकाणी त्याचा फायदा होतो)
तसेच डोळ्यातले पाणी ,अंगावर येणारा घाम, तोंडातली लाळ इथून येणाऱ्या जंतूंना लायसोझाईम नावाचा घटक तयार होऊन प्रतिकार करतो यासाठी पोषक अन्नघटक लागतात व यामध्ये प्रथिने पुन्हा एकदा महत्त्वाची असतात.
तसेच प्रतिकारशक्ती हे एका दिवसात एका तासात एखाद्या फळाने कधीच वाढत नसते. त्यासाठी पुन्हा एकदा तुमचे रोजची जीवनशैली ही व्यवस्थित असणे आवश्यक असते. त्यामुळे आत्ताच्या आधुनिक काळानुसार प्रतिकारशक्ती वाढवण्याणे आवश्यक आहे.