शास्त्र असतं ते ….

आज-काल प्रत्येकाला आपल्या मध्ये चांगले किंवा वाईट कोलेस्ट्रॉल किती आहे हे माहीतच हवं. शास्त्रच असतं ते ..

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या मते, सुमारे 79% भारतीयांमध्ये LDL( बॅड कोलेस्ट्रोल)सामान्य कोलेस्टेरॉल पातळीपेक्षा जास्त आहे.

HDL कोलेस्ट्रोल शरीरासाठी चांगलं असतं. त्यामुळे याची मात्रा 60 पेक्षा जास्त असायला हवी.

LDL कोलेस्ट्रोल, ज्याला बॅड कोलेस्ट्रोल म्हणतात. त्याची मात्रा 120 पेक्षा कमी असायला हवी.

यकृत शरीरात कोलेस्टेरॉल तयार करते, त्याशिवाय तुम्ही जे अन्न खाता त्यातूनही तुम्हाला कोलेस्टेरॉल मिळते. हे लिपोप्रोटीन नावाच्या पॅकेटच्या रूपात रक्तात वाहते.

रक्तातील फॅट्स वाढले की कोलेस्ट्रॉलचा त्रास चालू होतो यामागे अनेक कारणे असतात..

रात्री उशिरा व‌ भरपेट जेवणे.

सकाळी नाष्टा न करणे.

आहारामध्ये नमकीन पदार्थ, वडे, समोसे, मैदा, साखर, तळलेले पदार्थ ,शेव,फरसाण,गोड पदार्थांचा समावेश सतत असणं.

प्रमाणाबाहेर व्यायाम करणे.

गरजेपेक्षा जास्त खाणे.

धूम्रपान ,ड्रिंक्स घेणे .

अतिरिक्त ताण तणाव.

कमी झोप किंवा झोपण्याच्या चुकीच्या वेळा.

अहो शास्त्रच असतं ते…