संकल्प आहाराचा

चांगले बॅक्टेरिया व आपले आतडे

भाग 3-

99%आजारांचे मूळ वाईट बॅक्टेरिया

चांगले बॅक्टेरिया शरीरामध्ये नसणे हे 99% आजारांचे मूळ कारण आहे.

आज पाहूया चांगले बॅक्टेरिया व वाईट बॅक्टेरिया काय काम करतात.

चांगले बॅक्टेरिया —

1)चांगले बॅक्टेरिया शरीरामध्ये अनेक प्रकारचे विटामिन्स ,चांगले केमिकल्स, अमायनो ऍसिड्स, हार्मोन्सची निर्मिती करतात.

2)आपल्या लिव्हर मध्ये म्हणजे यकृतात पित्त तयार होऊन ते पित्ताशयामध्ये साठत असते. जर या पित्ताची कमतरता असेल तर शरीरामध्ये जिवनसत्व अ,ई,ड,के,के1,,के2, चे व फॅटी ऍसिडचे,ओमेगा3 यांचे अभिशोषण होत नाही.

जेव्हा चांगल्या बॅक्टेरियांच्या अभावी पिताचे काम बरोबर झाले नाही की आयबीएस सारखे आजार ,बद्धकोष्टतेचे विकार, अन्न बाधण्याचे प्रकार, अतिसार ,पोट बिघडण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी, पोटात कळा येणे, ॲलर्जी, जबड्याचे रोग ,त्वचारोग, चिडचिडेपणा, वजन कमी होत जाणे असे अनेक आजार चालू होतात.

3) महत्वाची जिवनसत्वे के,ब12,ब1, ब2,ब3, ब5,ब6, बायोटीन फोलिक ऍसिड ही बनण्यासाठी चांगले बॅक्टेरियाच लागतात.

4)चांगले बॅक्टेरियांमुळे ब्युटीरेट (butyric acid)या एका विशिष्ट अन्नघटकाची निर्मिती होत असते जे साखर नियंत्रित करण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, पोटातील इन्फलेमेशन (inflammation)कमी करण्यासाठी मदत करत असते.जर हा मुद्दा लक्षात घेतला तर अनेकांच्या लक्षात येईल कि अनेक वेळा साखर का नियंत्रित होत नाही किंवा वजन का कमी होत नाही.

5)चांगल्या बॅक्टेरियांमुळे अनेक आवश्यक अमायनो ऍसिडस तयार होण्यामध्ये मदत करतात यांच्या अभावी प्रथिनांचे संपूर्ण पचन होऊ शकत नाही अशा वेळी जे घटक तयार होतात त्यामुळे गाऊट सारख्या आजारांचा त्रास वाढतो.

6)आपणांस माहित आहे का,पाच आवश्यक चांगले बॅक्टेरियांच्या अभावी झोप निर्माण करणारे घटक तयार होऊ शकत नाहीत आणि निद्रानाश हा विकार जडतो. म्हणूनच झोप येण्यासाठी सुद्धा चांगले बॅक्टेरिया आवश्यक असतात.

7)चांगल्या बॅक्टेरीयांचा प्रभाव भूक, पोट भरल्याची जाणीव ,पचन यांवर असतोच असतो. म्हणूनच आम्ही खायचे की नाही, खायचे किती ही इच्छा ठरवण्यामागे बॅक्टेरिया हे असतातच.

8)चांगले बॅक्टेरिया मनाला नियंत्रित करतात हे सिद्ध झालेय. आपले आतडे कोट्यावधी मज्जातंतूद्वारे (neurotransmitter) मेंदूशी जोडलेले असते. काही अभ्यासात असे दिसून आले की विशिष्ट प्रोबायोटिक मुळे नैराश्य आणि मानसिक आरोग्य विकारांची लक्षणे सुधारू शकतात.न्यूरोट्रान्समीटर तयार करण्यामध्ये ही चांगले बॅक्टेरियाच असतात, आपल्याला आनंदी ठेवणारा सेरोटीनीन हार्मोन 95% टक्के हा चांगल्या बॅक्टेरियांतर्फे निर्मित असतो. डोपामाइन , नेरेपायनाफिरेन हे हार्मोन्स सुद्धा चांगले बॅक्टेरियांमुळे बनवले जातात. म्हणूनच आपण आनंदी असणे किंवा आपले मूड आपल्यातील आत्मविश्वास, सकारात्मकता यामध्येही चांगल्या बॅक्टेरियांचाच वाटा असतो.

9)चांगले बॅक्टेरिया अन्नघटकांचे शोषण करण्यास मदत करतात, त्यांचे शोषण वाढवतात. यांचे प्रमाण योग्य नसेल तर आपण कितीही मल्टिव्हिटॅमिन ,प्रोटीन, टॉनिक्स, सप्लीमेंट्स घेतले तरी पुन्हा त्याच त्याच समस्या उद्भवत राहतात.

10)आपल्या त्वचेवर कोट्यावधीने बॅक्टेरिया असतात म्हणून त्वचेच्या आरोग्यामध्ये ही हे महत्त्वाचे असतात.तसेच त्वचा निरोगी व चमकदार बनवतात.

वाईट बॅक्टेरिया-

वाईट बॅक्टेरिया हजारो रोग निर्माण करू शकतात.

1)आपल्या शरीराच्या संरक्षणासाठी जी काही नैसर्गिक रचना आहे ती मोडण्याचे काम हे वाईट बॅक्टेरिया करतात.

2)वाईट बॅक्टेरिया शरीरामध्ये जास्त प्रमाणात कोलेस्टेरॉलची निर्मिती करतात, अनेक एन्झाईम्स, हार्मोनल लेवल असंतुलित करतात यामुळे लठ्ठपणा वाढणे, हृदयविकार ,मधुमेह ,कॅन्सर असे अनेक प्रकारचे आजार वाढतात.

3)वाईट बॅक्टेरिया ट्रायमेथीलेमाईन एन ऑक्साईड (TMO) अशी विशिष्ट प्रकारची रसायने तयार करतात ज्याने वाईट कोलेस्ट्रॉल वाढते, रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात. त्यात वाईट कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराईड वाढून हृदय रोगांना आमंत्रण मिळते.

4)वाईट बॅक्टेरिया हे पोटातील वायू वाढवणे ,आतड्यांना आतून सूज येणे प्रतिकारशक्ती कमी होणे, पोटाचे विकार, पचनाचे आजार तयार करतात.

5)निद्रानाश ,ताण वाढणे, व्यक्तीमत्वा मधील नकारात्मकता वाढणे हे वाईट बॅक्टेरियांमुळे होऊ शकते.

6)डिप्रेशनची भावना वाईट बॅक्टेरिया तयार करतात त्यांची संख्या वाढली की उदास वाटणे, निरुत्साह जाणवणे हे ओघाने येतेच.

तज्ञांच्या मते शरीरामध्ये पन्नास टक्के पेक्षा जास्त वाईट बॅक्टेरियांची संख्या वाढली की कॅन्सर,सततचे इन्फेक्शन,एलर्जी असे अनेक प्रकारचे आजार चालू होतात.

थोडक्यात चांगले बॅक्टेरिया आपल्याला निरोगी आरोग्य देतात आपले आयुष्य घडवतात, स्टॅमिना वाढवतात, मनाने खंबीर व आनंदी बनवतात तर तर वाईट बॅक्टेरिया मानसिक व शारीरिक आरोग्य संपवतात.

वाईट बॅक्टेरिया घालवण्यासाठी व चांगले बॅक्टेरिया वाढवण्यासाठी आपण काय करायला हवे हे पुढील भागात पाहू.