तसेच खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात–
1)एखादा पदार्थ जास्त शिजवणे, तळणे किंवा कडक करणे यामुळे त्या पदार्थातील प्रोटिन्सचा उपयोग शरीराला होऊ शकत नाही. उदाहरणार्थ मटन , चिकन, मासे तळणे वडा, भजी इ. पोळीचा खाकरा करणे, अंडी
कडक होईपर्यंत भाजणे (बहुधा पुलाव किंवा बिर्याणी बनवताना)
2) अल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक करणे टाळा.
3)रंगीत भाज्या नरम शिजवून घ्याव्या. पालेभाज्या, गाजर ,बीट, लाल भोपळा यामध्ये अ जीवनसत्वाचा पूर्वघटक केरोटीन हा असतो. या भाज्या योग्य प्रमाणात शिजवल्याने ‘अ’ जीवनसत्वाचा शरीराला चांगला उपयोग होतो.
4) तळणे टाळा.
5) स्वतःच्या शारीरिक व मानसिक ताकदीसाठी ताजे गरम पदार्थ खायला प्राधान्य द्या.
6) फोडणीसाठी लोखंडी पळी कढई वापरा.
7) दररोज उठून भात व चपाती किती करायच्या यापेक्षा डाळी, कडधान्य आणि भाज्या किती करायच्या यांचे प्लॅनिंग करा.
8) मोड आलेले मेथीचे दाणे आवर्जून भाजीमध्ये- कोशिंबीरमध्ये रोज घालावे.
9) कोणताही पदार्थ पाण्यात घालून उघडायचा असेल तर प्रथम पाण्याला उकळी आल्यानंतर तो जिन्नस त्यात घालावा.
10) कुकरमध्ये अन्न प्रमाणाबाहेर शिजवू नका.
11) आऊटिंग किंवा हॉटेलींग असेल तरीही पोषणासाठी आवश्यक पदार्थांना प्राधान्य द्या.
12)4 किलो मध्ये एक किलो भाजलेले सोयाबीन व 250 ग्रॅम मेथीदाणे घालावेत.
13)फळे चावून चावून खा.
शांत झोप घ्या. 14)समतोल आहाराबरोबर शरीराला व्यायामाचीही गरज असते.