संक्रांत जवळ आली की बाजरीचा वापर वाढतो.
बाजरी नावाचे सुपरफुड
1)शरीराला बळकटी देतं,
2)केसांचे आरोग्य चांगले ठेवते
3)स्मरणशक्ती चांगले बनवते.
4)हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते.
म्हणून या सुपर फूड धान्याचा वापर ऋतू परिवर्तनाच्या काळात करण्याची पद्धत असावी. कारण अनेक मिश्र गुणधर्म देणारी ही बाजरी शरीरासाठी व मनासाठी खूप वेगळ्या पद्धतीने काम करते.
जोरदार थंडी आहे आणि अचानक बदल होऊन उन्हाळा सुरू झाला तर शरीर असो वा निसर्ग, कोणीच एवढा तीव्र बदल सहन करू शकत नाही. म्हणूनच संक्रांतीच्या सणाला महत्त्व आहे. व तेवढेच त्या काळात घेतल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांना.
संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. बाजरीची भाकरी, लोणी, मुगाची खिचडी वांगी, सोलाणे, पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्ध अन्नपदार्थांचा वापर जेवणात करतात. तीळ वापरण्यामागे दुसरा अर्थ स्निग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह- मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने -नविन नाते समृद्ध करायचे. व पुन्हा एकदा सूर्याच्या साक्षीने शरीरांशी व मनाशी स्नेह व स्निग्धतापूर्वक नातं समृद्ध करत न्यायचे. तिळगुळ घ्या गोड बोला.
अहो शास्त्र असतं ते…….
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
आहारतज्ञ शीतल मुदगल