सीने में जलन ,आंखों में तूफ़ान सा क्यों है! इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है?

हे कधीकधी खऱ्या आयुष्यात सुद्धा आपण अनुभवत असतो. नकळत आपण वेगवेगळ्या स्पर्धेत चढाओढीत सामील झालेलो असतो. आणि याचा शारीरिक ,मानसिक ,सामाजिक स्ट्रेस -ताण अनुभवतो. जगत असताना आयुष्यात जे बदल होतात आणि त्यावर आपलं शरीर भावनात्मक व शारीरिक प्रतिक्रिया देते तेव्हा अनेक वेळेला मेंदू थकतो .या थकव्यामुळे हा ताण म्हणजे स्ट्रेस वाढतो.

मेंदू म्हणजे शरीराचा जणू राजाच तसेच शरीरातील सर्वात प्रमुख म्हणजे हृदय ,यकृत ,किडनी (heart, liver, kidney) हे अवयवसुद्धा मेंदूला जोडलेले असतात. समजा जर लिव्हरचे म्हणजे यकृताचे काम बिघडले तर नकळत मेंदू च्या आरोग्यावर परिणाम होतोच. तसेच मेंदूचे काम नीट नसेल तर यकृताचे कामही नीट होत नाही. असेच हृदय व किडनी बाबतीतही असते.

तसेच अधिक खाणे झाले, सारखा सारखा प्रवास करणे, मैदा, तळलेले पदार्थ खाणे, अतिमैथुन, अँटिबायोटिक्स,

अति व्यायाम करणे, अति पाणी पिणे, सप्लीमेंटस घेत राहणे, अतिविचार करणे अशा अनेक गोष्टीनी शरीर यंत्रणेवरचा ताण वाढतो. नकळत मानसिक ताण वाढतो. थोडक्यात शरीर व मनाचे आरोग्य बिघडते.

अशावेळी शरीरातील कचरा काढणे व मनातील भावनांचा निचरा करून शांतता अनुभवणे गरजेचे असते. आणि यासाठीच एक सोपा उपाय म्हणजे आमचा ऑनलाईन स्वास्थ्यम नवरात्री डिटॉक्स प्रोग्राम. हा प्रोग्रॅम फक्त नवरात्रात केला जातो याला अनेक कारणे आहेत. या प्रोग्रॅमचे आम्ही व्यापारीकरण कधीच करत नाही म्हणून वर्षभर यातील कोणतीच ट्रीटमेंट आमच्या इतर प्रोग्राम मध्ये नसते व ती द्यायचीही नसते. म्हणून हा थोडासा आगळावेगळा ही असतो.

चला तर मग नक्कीच या संधीचा फायदा करून आरोग्य, उत्साह व प्रसन्नता अनुभवूया. थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया. नवीन सुरुवात करूया.