1) मधुमेह व ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांनी किडनी विकाराकडे दुर्लक्ष करू नये.
2) वारंवार होणारी युरीन इन्फेक्शन किडनी स्टोन यासारखे आजारांना वेळेत किडनी रोग तज्ञांना दाखवून घ्यावे.
3) डायलिसिस वर असणाऱ्या पेशंटने आपले डायलिसिस कोठे होते तिथे ॲरो पाणी वापरले जाते का? याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे हे मळमळ, उलटी वाढू शकते.
4) किडनीचे काम जेव्हा दहा टक्के पेक्षाही कमी होते तेव्हा किडनी ट्रान्सप्लांट लागण्याची शक्यता वाढते.
5) सर्व सामान्य माणसांमध्ये वय वाढत जाते तसे दरवर्षी एक टक्क्याने किडनीचे काम कमी होत असते हेच प्रमाण मधुमेह रुग्णांमध्ये दहा टक्के नी कमी होत असते.
आहार मार्गदर्शनातील काही महत्त्वाचे मुद्दे–
DIETICIAN SHEETAL MUDGAL ….
1)किडनी रुग्णांनी औषधाप्रमाणे आहार प्रमाणातच घेणे आवश्यक आहे.
2,)किडनी रुग्णांचा आहार हा त्यांची औषधे, शरीराची ताकद, खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी, किडनी विकाराची स्टेज यावर व्यक्तीनुसार ठरवला जातो.
3)डायलिसिसवर असणाऱ्या रुग्णांमध्ये प्रथिनांची गरज जास्त असते तर डायलिसिस वर नसणाऱ्या रुग्णांना प्रथिने ठराविक प्रमाणातच घ्यावी लागतात.
4)परंतु कोणत्याही किडनी रुग्णांच्या आहारामध्ये चांगल्या क्वालिटीचीच योग्य प्रथिने आहारात असावी.
5) फॉस्फरस, सोडियम ,पोटॅशियम असे असे रक्तातील घटक वाढले तर किडनी वरील ताण अधिक वाढतो म्हणून याचे प्रमाण आहारात कमी असावे.
6) किडनी रुग्णांनी बाहेर फॅक्टरीमध्ये बनलेले सर्व पदार्थ टाळावेत.
7) आहारात मीठ कमी असावे परंतु पांढरे मीठ चालत नाही म्हणून सैंधव मीठाचा वापर अति प्रमाणात करू नये किंवा सैंधव मीठाचे इतर पदार्थ करून खाऊ नयेत. ही गोष्ट किडनीवर ताण वाढवणारीच ठरेल.