अॅसिडिटी, गॅसेस ,जळजळ हा आजकाल सगळीकडे दिसणारा एक सामान्य प्रॉब्लेम आहे. सध्या अॅसिडीटी लहान मुलांमध्येही दिसते.
कुणाला जळजळतं , तर कुणाला मळमळतं, कुणाचे यामुळे डोके दुखते तर कुणाचे पोट दुखत असते. कधी खूप ढेकर येतात किंवा तोंडामध्ये कडवटपणा येतो. जळजळ होण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील एक कारण म्हणजे अॅसिडीटी.
हायड्रोक्लोरिक ऍसिड (पोटातील ऍसिड) हा पचन क्रियेसाठी लागणारा एक महत्वाचा घटक आहे जो खाण्यायोग्य अन्न कणांच्या तोडण्यात मदत करतो. निरोगी व्यक्तीला दुपारी बारा ते दोन या वेळेत चांगली भूक लागते व त्यामध्ये व्यवस्थित अन्नपुरवठा झाला की हे भूक शांत होते.पुन्हा ठराविक वेळीच या अॅसिडची उत्पत्ती होते.
पण आजच्या जीवनशैलीमध्ये कामाच्या आणि जेवणाच्या ही अनियमित वेळा, धावपळीचे दैनंदिन आयुष्य, बदलती जीवनशैली, जागरण, बदललेले आहाराचे स्वरूप यांमुळे अपचन किंवा अॅसिडीटीचा त्रास वाढताना दिसतो.
पचनाची क्रिया बिघडणे म्हणजे अपचन होते. अन्न घटकांचे पूर्ण पचन न झाल्यास, गॅसेस होतात. यामुळेच करपट ढेकर / गॅस शरीराबाहेर टाकला जातो. काही वेळा उलट्याही होतात.
अपचन टाळता आले नाही ऍसिड रिफ्लक्स चे प्रमाण वाढते.
एसिड रिफ्लक्स म्हणजे पोटातील ऍसिड परत अन्ननलिकेत जाणें .यामुळे पोट दुखणे,छातीत जळजळ जाणवणें,सतत कोरडा खोकला राहणे.घशात आणि गळ्यात एसिड रेफ्लक्स मुळे वेदना होणे हे प्रमाण वाढते .
अॅसिडीटी साठी योग्य वेळेला जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक असतं. सतत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेल्या अँटासिड गोळ्यांचे चे गंभीर परिणाम पुढे दिसून येतात.
अॅसिडीटीचा होऊ नये म्हणून जीवनशैलीमध्ये खालील बदल करू शकता.–
1)अति तिखट- मसालेदार पदार्थ, शिळे अन्नपदार्थ खाणे टाळा.
2)चुकीच्या वेळी -भूक नसताना खाऊ नका
3)प्रत्येक घास चावून चावून खा.
4)झोप व्यवस्थित घ्या. मानसिक तणाव टाळा.
5)हालचाल वाढवा.
6)आहारामध्ये अॅसिडीक पदार्थांबरोबर अल्कलाइन पदार्थांचे कॉम्बिनेशन हवे.
7)मद्यपान, धूम्रपान टाळा.
अॅसिडीटीचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी योग्य वेळीच आहारामध्ये-जीवनशैलीमध्ये बदल करा .