कोजागिरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

चार महिन्याचा पावसाळा संपल्यानंतर जी पहिली पौर्णिमा येते ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा.याला ‘शरद पौर्णिमा’, ‘माणिकेथारी’, ‘नवान्न पौर्णिमा’ , कौमुदी पौर्णिमा, ‘माडी पौर्णिमा’अश्विन पौर्णिमा असे देखील म्हणतात.

ऋतू बदलताना –पावसाळ्याच्या शेवटी शरीरातील  आम्लपित्त वाढते. उष्णता वाढते. अशावेळी ताकद देणारे थंड पदार्थ खाल्ले जावेत. ऋतू बदलामुळे बऱ्याच वेळा झोपेचा पॅटर्न ही बदलतो. भारतीय आहारात हवामान व व्यक्तीप्रकृती नुसार झोपताना दूध पिणे हे मानसिक व शारीरिक संतुलनासाठी महत्त्वाचे मानले आहे.

शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात ठेवलेली खीर किंवा मसाला दूध खाल्ल्याने अनेक रोगांपासून आराम मिळतो असे मानले जाते.

पावसाळ्यात आकाश स्वछ नसते परंतु या पौर्णिमेला आकाश खूप दिवसानंतर स्वछ आणि सुदर दिसते.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो.ज्यामुळे रात्रीच्या वेळी चंद्राचे संपूर्ण रूप पाहाता येतं. या दिवशी पडणारा चंद्राचा प्रकाश आरोग्यासाठी उत्तम असतो असं म्हणतात. 

या चंद्र प्रकाशातील मसाला दूधाला अमृत असे म्हटलेले आहे. असे मसाला  दूध पिण्याचे फायदे—-

1)कॅल्शियमची कमतरता कमी होते

2)चांगली झोप लागते

3)रात्री झोपताना दूध पिण्यामुळे तुम्हाला सकाळी लवकर भुक लागत नाही. ज्यामुळे तुम्ही चुकीचे पदार्थ कमी प्रमाणात खाता.

4)मानसिक स्वास्थ  मिळते.

5)रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

6) त्वचा विकार कमी होतात.

मात्र हे दूध बनवताना आपण भरपूर साखर, साय न घालता आत्ता आपल्या बदललेल्या जीवनशैली प्रमाणे व हल्लीच्या आजारानुसार या बनवण्याच्या पद्धतीमध्ये बदल करायला हरकत नाही.

मसाला दूध कसे तयार करावे ?

साहित्य – 1/2 लिटर कमी फॅटचे  दूध , 1 छोटा चहाचा चमचा साजूक तूप,

हळद अर्धा चमचा , चवीपुरती काळी मिरी पावडर , सुंठ पावडर, दालचिनीचा छोटा तुकडा

 एक चमचा बदाम, एक चमचापिस्ता, 

केशर, वेलची पूड चवीपुरते ई.

मसाला दूध तयार करण्याची कृती –

1)दूध मंद आचेवर गरम करा. हळद, काळी मिरी पावडर, व दालचिनीचा तुकडा मिक्स करून व्यवस्थित हलवा.

2)दूधाला उकळी येऊ द्या. दूध आटल्यावर त्यात वेलचीपूड, सुकामेव्याचे काप आणि केशर, सुंठ पावडर घाला.

 3)दूधाखालील गॅस बंद करून त्यात 1/2चमचा तूप मिक्स करावे.

 तयार मसालेदूध चंद्राची प्रतिकृती पडेल अशा पद्धतीने ठेवून मग सर्वांना वाटा. 

कोजागिरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!