चांगले बॅक्टेरिया व आपले आतडे
भाग 2
एक विसरलेले इंद्रिय –चांगले बॅक्टेरिया
आपली आतडी अत्यंत चांगली असणं हीच आपल्या आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे. आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवायचे म्हणजे नक्की काय करायचे.आपले शरीर कोट्यावधी बॅक्टेरिया, जिवाणूनी भरलेले आहे आणि हे सर्व एकत्रितपणे मायक्रोबायोम म्हणजेच सूक्ष्मजीव म्हणून ओळखले जाते. खरंतर माणुस हा पण एक प्रकारचा बॅक्टेरियाच आहे.कारण आपल्या शरीरामध्ये जेवढ्या आपल्या पेशी आहे त्याच्या दहापट जास्त बॅक्टेरिया आहेत. असे सांगितले जाते की आपल्या शरीरात 100 ट्रिलियन (100लाख अब्ज) बॅक्टेरिया आहेत. म्हणजे मानवाच्या जीन्स पेक्षा बॅक्टेरियांचे जीन्स आपल्यामध्ये जास्त आहेत. आणि म्हणूनच आपला प्रत्येक आजार, निरोगीपणा, रोगप्रतिकारक शक्ती, पचनशक्ती, एवढच काय तर आपला स्वभाव ,आपले विचार, आपलं मन या सर्व गोष्टी कोठे न कोठे बॅक्टेरियांशी निगडित आहेत. आपल्या शरीरामध्ये तीन प्रकारचे बॅक्टेरिया येत असतात.
1)चांगले बॅक्टेरिया
2)वाईट बॅक्टेरिया
3)चांगलेही नाहीत व वाईटही नाहीत असे बॅक्टेरिया
यातील कोट्यावधी बॅक्टेरिया आपल्या त्वचेवर ,आतड्यांमध्ये, तोंडामध्ये ,असे पूर्ण शरीरामध्ये असतात. यांचे एकूण वजन दोन ते सहा पौंड (0.9–2.2किलो) एवढे असते.आपले वजन कितीही असले तरी प्रत्येकाच्या शरीरात एवढे बॅक्टेरिया हे असतातच. पण इथेच महत्त्वाचा भाग येतो की हे चांगले बॅक्टेरिया असणे आवश्यक आहे.
1908 साली मॅकनिकाॅफ आणि पाॅल एलीच यांनी दाखवून दिले की प्रतिकारशक्ती व पचनशक्ती बनवून चांगली बनवण्यासाठी चांगले बॅक्टेरिया शरीरात असावे लागतात. व इथून पुढे जास्तीत जास्त शरीर व बॅक्टेरिया यांवर अभ्यास चालू झाला. 1990 सालानंतर यांवरील शोधांना गती आली.त्या दरम्यान हे सिद्ध झाले की एखाद्या व्यक्तीच्या फक्त पचनसंस्थेमध्ये 300 ते 500 एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या या जिवाणू (बॅक्टेरिया) असतात.तर हेच संशोधन विसाव्या शतकात या मानवी आतड्यांमध्ये 1000 जिवाणूंच्या प्रजाती आहेत व प्रत्येक शरीरात भिन्न भूमिका बजावतात इथपर्यंत आले. त्याच बरोबर चांगले बॅक्टेरिया वाढण्यासाठी अन्न म्हणून मानवाने काय खावे हे संशोधन गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात झाले.
आजचे आपले न्यूट्रिशन सायन्स
YOU ARE WHAT WHAT YOU EAT
इथून आज
YOU ARE WHAT WHAT YOU ABSORB
इथपर्यंत येऊन पोहोचले .व त्यासाठीच आपणास माहीत हवे की शरीरातील आपल्या मेंदू एवढ्या वजनाचे हे बॅक्टेरिया एकत्रितपणे एक अतिरिक्त अवयव म्हणून काम करतात. अतिशय महत्वाची भूमिका बजावतात.हे एवढे सूक्ष्म बॅक्टेरिया शरीरात कसे व कोणते काम करतात व एवढे महत्त्वाचे का आहेत हे आपण येणाऱ्या भागात बघू.