चांगले बॅक्टेरिया व आपले आतडे
भाग 4-
चांगले व वाईट बॅक्टेरिया काय खातात.
आपण पाहिले की शरीरात वाईट बॅक्टेरिया यांचे प्रमाण जेवढे जास्त तेवढे शारीरिक व मानसिक आजार जास्त .आपल्या शरीरात कोट्यावधी बॅक्टेरिया असतात आणि आपण जे खातो त्यावर ते वाढतात. Bacteroids म्हणजे चांगले बॅक्टेरिया व Fermicutes म्हणजे वाईट बॅक्टेरिया ही मानवी आतड्यात आढळणारी बॅक्टेरिया यांची सामान्य कुटुंब असतात. पण यांचा रेशो हा शरीरात प्रमाणात असणे गरजेचे असते. चांगले बॅक्टेरिया 85 टक्के तर वाईट बॅक्टेरिया 15 टक्के असे प्रमाण शरीरात असते. म्हणजे 85:15 हा रेशो नसेल तर समतोल बिघडतो व अनेक आरोग्य समस्या उद्भवतात. चांगल्या बॅक्टेरिया मध्येही एक-तृतीयांश बॅक्टेरिया(1/3) आपल्यासाठी सर्वसाधारण असतात तर दोन तृतीयांश (2/3).बॅक्टेरिया अतिशय महत्त्वपूर्ण असतात आणि या फक्त आहारातूनच आपण घेत असतो.आपण घेतलेला आहार हा बॅक्टेरियांमध्ये अनेक बदल घडवून आणतो या मागे खूप मोठे सायन्स आहे. म्हणूनच योग्य अन्न निवडणे ही आज गरजेचे आहे.
वाईट बॅक्टेरिया नक्की काय खातात किंवा ते कशाने वाढतात?
1)वाईट बॅक्टेरियांना साखर व चरबीयुक्त पदार्थ खायला खूप आवडतात व हे खाऊनच ते जास्त चरबी तयार करणारे द्रव्य तयार करतात व अनेक आजार वाढवतात. तसेच जास्त गोड पदार्थ खाल्ल्यास चांगले बॅक्टेरिया सहज मरतात
2)तळलेले पदार्थ ,मसालेदार पदार्थ, अल्कोहल ,प्रक्रिया केलेले पदार्थ कोल्ड्रिंक, मैदा ,अति तिखट खाणे, कॉर्नसिरप याने चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात व वाईट बॅक्टेरिया वाढतात.
3)Artificial sweeteners म्हणजेच कृत्रिम गोड पदार्थ आजकाल बाजारात मिळणारे अनेक प्रकारचे स्वीटनर वाईट बॅक्टेरिया वाढवतात .यावरील संशोधन असे सांगते की यामुळे आतड्यांमध्ये एन्टरोबॅक्टेरियांची वाढ होते. खूप लोकांना असे वाटते की मी साखर न घेता स्वीटनर घेऊनही माझे वजन व साखर का वाढते ?त्याचे हे प्रमुख कारण.
4)प्रतिजैविक म्हणजे अँटिबायोटिक्स ,गर्भनिरोधक गोळ्या,कीटकनाशके, इमल्सिफायर यांनी चांगले बॅक्टेरिया मरतात. कोणतीही औषधे ही सावधानतेने डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मर्यादित काळापुरतीच घ्यायची असतात.
5)अतिप्रमाणात मांसाहार हा सुद्धा /वाईट बॅक्टेरिया वाढवतो कारण जेव्हा यातील प्रथिने व चरबी योग्य पद्धतीने पचत नाहीत तेव्हा वाईट बॅक्टेरिया त्यांचा वापर विषाणू तयार करण्यासाठी करतात मग आतड्यांना सूज येऊन नुकसान होते. यासाठी पूर्ण शाकाहारी होण्याची गरज नाही पण मांसाहार हा योग्य पद्धतीने प्रमाणात घ्यायला हवा.
6)उघड्यावर ठेवलेले अन्नपदार्थ, उघड्यावर ठेवलेले गोड पदार्थ यामध्ये प्रचंड प्रमाणात वाईट बॅक्टेरिया असतात.
7)) ताणतणाव — मुळे जे वाईट बक्तेरिया वाढतात ते अनेक जैवरासायनिक बदल घडवून आणतात याचा परिणाम होऊन पेप्टिक अल्सर ,आयबीएस, अन्न पदार्थांची एलर्जी , जठरांचे आजार , गॅस्ट्रोइंटेस्टाईलरिफ्लक्स डिसीज असे आजार तयार होऊ शकतात.
खरंतर शास्त्रज्ञानी लहान आतड्याला दुसरा मेंदू असे नाव दिले आहे. यावरून समजते की महत्वपूर्ण अवयव आहे व जर वाईट बॅक्टेरिया यामध्ये असतील तर काय होईल?
आता पाहूया चांगले बॅक्टेरिया कसे वाढतात किंवा काय खातात?